Tuesday, 20 September 2016

सुप्रभात सुजनहो!!!

🙏🏼 *सुप्रभात सुजनहो* 🙏🏼

*तु खरच खुप खास आहेस..*

डोळे मिटुन जेव्हा स्वतःला शोधशील,
तेव्हा कळेल..
*तु खुप खास आहेस...*

आयुष्य म्हणजे
आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी
करावा लागणारा प्रवास आहे..
मग प्रवासात कधी दरी, कधी पर्वत..
कधी वादळ,तर कधी वाळवंट आहे..
कधी ऊन, तर कधी मुसळधार पाऊस आहे..
कधी गालिचे, तर कधी काट्यांची फौज आहे..
पण नजर लक्ष्यावर असेल,
तर कळेल हा प्रवास तर एक मौज आहे..
अशा असंख्य लक्ष्यांची तुझी आस आहे..
डोळे मिटुन जेव्हा स्वतःला शोधशील..
तेव्हा कळेल,
*तु खरंच खुप खास आहेस...*

वेदनांचे स्वतःचे एक महत्त्व आहे..
त्या सहन केल्यास
तरच तुझं एक ’अस्तित्त्व’ आहे..
पण जर पळुन गेलीस..
तर मात्र पराभवाचे प्रभुत्त्व आहे..
प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर,
कधी शुभेच्छा, तर कधी शिव्या-शाप आहे..
दुर्लक्ष केलस तर कळेल,
तुला तर तुझ्या स्वप्नांचाच इतका व्याप आहे..
काहीही झाले तरी डगमगु नकोस,
तुझ्यात प्रचंड साहस आहे..
डोळे मिटुन स्वतःला शोधशील
तर कळेल..
*तु खरंच खुप खास आहेस...*

संकलन -
      श्रीनाथराव पाटील
              करंबळी

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

Monday, 28 December 2015

डीसीपीएस कपात बंद करा

🏇🏼🏇🏼🏇🏼🏇🏼🏇🏼🏇🏼🏇🏼🏇🏼

🌞 सर्व केडरची डीसीपीएस/एनपीएस कपात बंद करण्यासाठी जिप स्थायी, आरोग्य, अर्थ व शिक्षण इ. विभागाचे एकत्रित ठराव घेण्यासाठी प्रयत्न करणे. तसे ठराव राज्य शासनाकडे पाठविणे गरजेचे आहे...

🌞 माहिती अधिकार कायद्याचा वापर करुन कपात झालेली कर्मचाऱ्यांची एकुण रक्कम, त्यात राज्य शासनाने जमा केलेले अंशदान व त्यावरील ८% प्रमाणे व्याज जमा आहे का याची माहिती मागविणे...

🌞 कपात बंद करण्यासाठी सर्व संघटनांचे पाठींब्याचे लेखी पत्र घेऊन ते जिप ला सादर करणे...

🌞 यासाठी जिल्हा कार्यकारीणीने तत्पर राहणे आवश्यक आहे...

श्री. श्रीनाथ पाटील,
जिल्हाध्यक्ष कोल्हापूर...

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼